Home क्राईम प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त, तीन अज्ञातांवर गुन्‍हा

प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त, तीन अज्ञातांवर गुन्‍हा

1043

महादेव नगरी बनतेय तंबाखु तस्‍करांचा अडडा…!

रोखठोक | शहरालगत असलेल्‍या चिखलगांव ग्रामपंचायत हददीतील महादेव नगरी परिसरातुन वणी पोलीसांनी प्रतिबंधीत तंबाखुचा साठा हस्‍तगत केला होता. अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या फिर्यादीवरुन तीन अज्ञात व्‍यक्‍तीवर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला तर  8  लाख  2 हजार 304 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राञपाळीत गस्‍तीवर असलेले पोलीस उप निरिक्षक प्रविण हिरे यांना टिप मिळाली की, महादेव नगरी परिसरातील पाण्‍याच्‍या टाकी जवळ पांढऱ्या रंगाची वॅगनआर क्रमांक MH31 DC 4775 संशयास्‍पद स्थितीत उभी आहे. त्‍यांनी तातडीने घटनास्‍थळ गाठले आणि वाहनाची झाडाझडती घेतली असता त्‍यात प्रतिबंधीत तंबाखुचा साठा आढळुन आला. त्‍यांनी ते वाहन जप्‍त करत अन्‍न व औषधी प्रशासन विभागाला सुचित केले.

अन्न सुरक्षा अधिकारी यांनी मंगळवारी जप्‍तीतील मालाची तपासणी केली असता राज्‍यात प्रतिबंधीत असलेले शिशा हुक्का तंबाखू 8 पेट्या, ईगल सुगंधीत तंबाखू 6 थैल्‍या, राजश्री पान मसाला 2 थैल्‍या, विमल पान मसाला 6 थैल्या, सुगंधीत सुपारी 8 थैल्‍या, ब्लॅक लेबल तंबाखू 1 थैली एकूण किंमत  4  लाख  52 हजार  301 रुपयांचा प्रतिबंधीत तंबाखु व 3 लाख 50 हजार रुपयांचे वाहन असा एकूण 8 लाख  2 हजार 301  रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

निकोटिन’ ची लत लागलेल्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्याकरिता वणी शहरात मागील काही कालखंडात तंबाखू साम्राट उदयास आले आहे. त्‍यातल्‍या त्‍यात महादेव नगरी आता प्रतिबंधीत व बनावट तंबाखु तस्‍करांचा अडडा झाला की काय अशी शंका उपस्थित होत आहे. यापुर्वी सुध्‍दा पोलीसांनी त्‍या परिसरात घाडसञ अवलंबत कारवाया केल्‍या आहेत. या प्रकरणातील मुख्‍य आरोपींपर्यंत पोहचण्‍यासाठी पोलीसांनी केलेल्‍या जुन्‍या कारवाईचे तार जुळतात का हे तपासल्‍यास खरा म्‍होरक्‍या ताब्‍यात येईल हे निश्चित.
वणी: बातमीदार