
● नगर पालिकेची कारवाई
रोखठोक |:– शहरात नगर पालिकेच्या मालकीचे गाळे मोक्याच्या ठिकाणी आहे. भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या गाळ्यांचा किराया व कर थकविणाऱ्या महाभागांचे सात गाळे सील करण्यात आले. ही धडक कारवाई बुधवारी पालिका प्रशासनाने केली.
नगर पालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी या करिता पालिका प्रशासनाने शहरात अनेक ठिकाणी गाळे बांधले आहे. हे गाळे दुकानदारांना किरायाने दिले आहे व त्याचे दरमहा भाडे व कर ठरलेला आहे.

अनेक गाळे धारकांकडून पालिकेला नियमित किराया व कर येत नसल्याने अशा गाळे धारकांना पालिका प्रशासनाने नोटीस बजावून भाडे व कर भरण्याच्या सूचना देऊन अवधी दिला होता. मात्र दिलेल्या अवधीत देखील अनेकांनी भाडे व कर भरलेच नाही.

अखेर नगर पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. नगर परिषद शाळा क्रंमाक दोन जवळ असलेल्या शिवतीर्थ कॉम्प्लेक्स मधील पहिल्या मजल्यावरील सात गाळ्यांना पालिकेच्या पथकाने सील ठोकले आहे. या कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.
वणी: बातमीदार