● शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना
रोखठोक | सध्यस्थीतीत तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. अवघ्या 32 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची घटना बुधवार दि. 11 जानेवारीला उघडकीस आली.
हनुमान चरणदास राजुरकर (32) असे मृतकाचे नाव आहे. तो परमडोह येथील निवासी होता, घटनेच्या दिवशी दुपारी घरी कोणीच नसल्याची संधी साधून त्याने गळफास लावून आत्महत्या केली.
ही बाब घरच्यांना कळताच त्यांनी एकच हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्यांनी पोलिसांना सूचित केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. तरुणाने आत्मघातकी पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.
वणी : बातमीदार