● अडेगाव येथील घटना
रोखठोक | मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीतील अडेगाव येथे वास्तव्यास असलेल्या 27 वर्षीय तरुणाने विष प्राशन केले. त्याला वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही घटना शुक्रवार दि.13 जानेवारीला रात्री घडली.
अनिल दशरथ माशीरकर (27) असे मृतक तरुणाचे नाव आहे. तो अडेगाव येथील निवासी होता. शुक्रवारी दुपारी त्याने विषारी द्रव प्राशन केले. ही बाब घरच्या मंडळींना कळताच त्याला तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
शुक्रवारी रात्री दवाखान्यात दाखल झालेल्या रुग्णाला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. शनिवारी सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात येणार आहे. त्या तरुणाने जीवनयात्रा का संपवली हे समजू शकले नाही.
वणी: बातमीदार
