Home Breaking News बाळूसेठ नगरवाला यांचे निधन

बाळूसेठ नगरवाला यांचे निधन

3347

रोखठोक |:- प्रतिष्ठित उद्योजक तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र उर्फ बाळूसेठ नगरवाला यांचे मंगळवार दि 17 जानेवारीला नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले ते मृत्यूसमयी 70 वर्षाचे होते

नरेंद्र नगरवाला हे गेल्या 10 वर्षांपासून शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात लोकमान्य टिळक महाविद्याल्याने व शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाने चांगली प्रगती केली. शिस्तप्रिय अध्यक्ष म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.

त्याचा सामाजिक क्षेत्रात देखील मोठा वाटा आहे. लायन्स क्लब च्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहे. गेल्या काही दिवसा पासून ते आजारी होते. त्यांचेवर नागपूर येथे उपचार सुरू होते आज दि 17 जानेवारीला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई असा परिवार आहे.
( रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)