Home Breaking News ACB च्या जाळ्यात अडकला ‘नगरसेवक’

ACB च्या जाळ्यात अडकला ‘नगरसेवक’

1782

दारू दुकानदारांकडून लाच घेणे भोवले

रोखठोक | लोकसेवकांचे काळे कृत्य आता चव्हाट्यावर यायला लागले आहेत. चक्क नगरसेवकानेच देशी दारू दुकानदाराला लाच मागितली आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ही गंभीर घटना बुधवार दि. 18 जानेवारीला दुपारी मारेगाव येथे उजागर झाली.

अनिल उत्तमराव गेडाम (45) असे लाच स्वीकारणाऱ्या नगरसेवकांचे नाव आहे. तो मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधून निवडून आला होता. त्या प्रभागात तेथेच एक ऐशी दारूचे दुकान आहे. त्या देशीदारू दुकाना विरूध्द मुख्याधिकारी, नगर पंचायत मारेगांव यांना तक्रार दिली होती.

दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी लोकसेवक अनिल गेडाम यांनी सि.एल. 3/47 या किरकोळ देशीदारू दुकानाच्या मालकाला दुकान सुरळीत चालू ठेवण्यासाठी 90 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी त्रस्त दारू दुकान धारकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

घटनेच्या दिवशी तडजोडीअंती रक्कम देण्याचे ठरले. बुधवारी दुपारी 90 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पडकण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक मारूती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक अरूण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक शैलेश सपकाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक कारेगांवकर, ज्ञानेश्वर नालट, अब्दुल वसिम, महेश वाकोडे, सचिन भोयर, सुधीर कांबळे, राहुल गेडाम यांनी केली.
वणी: बातमीदार