Home Breaking News अठरा वर्षीय तरुणाने घेतला गळफास

अठरा वर्षीय तरुणाने घेतला गळफास

1158

वाघदरा येथील घटना

रोखठोक | शहरालगत असलेल्या वाघदरा येथे अवघ्या अठरा वर्षीय तरुणाने आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवार दि. 24 जानेवारीला दुपारी उघडकीस आली.

प्रतीक किशोर पावडे (18) असे मृतकाचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह जुना वाघदरा येथे वास्तव्यास होता. घटनेच्या दिवशी तो आपल्या आई, वडिलांसोबत शेतात गेला होता. काही वेळाने त्याचे पालक दुसऱ्या शेतात निघून गेले, तो लगतच्या शेतात थांबला.

काही कालावधी नंतर दुपारी दोन वाजताच्या दरम्यान तो घरी परतला. घरी कोणीच नसल्याची संधी साधून त्याने गळफास लावून आपले जीवन संपवले. ही दुर्दैवी बाब पारिवारिक मंडळींना कळताच त्यांनी पोलिसांना सूचित केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

अवघ्या एकवीस वर्षाच्या तरुणाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं हे कळायला मार्ग नाही. तालुक्यात तरुण मुले तडकाफडकी आपला आत्मघात करत असल्याचे वास्तव सातत्याने समोर येत आहे. वाघदरा येथील प्रतीक ने आत्महत्या का केली हे स्पष्ट होऊ शकले नाही. पुढील तपास पोलीस करत आहे.
वणी: बातमीदार