Home Breaking News त्याने…मध्यरात्री घेतला गळफास, संपवले जीवन

त्याने…मध्यरात्री घेतला गळफास, संपवले जीवन

1822

मारेगाव तालुक्यातील घटना

रोखठोक | मारेगाव तालुक्यातील मदानापूर या गावात वास्तव्यास असलेल्या 55 वर्षीय व्यक्तीने मध्यरात्री गळफास लावून जीवनयात्रा संपवली. ही बाब रविवारी पहाटे उजागर झाली.

हरिदास बाजीराव गेडाम (55) असे मृतकाचे नाव आहे. ते आपल्या परिवारासह मदानापूर या गावात वास्तव्यास होते. शनिवारी पारिवारिक मंडळी साखरझोपेत असताना त्यांनी घराच्या छताला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली.

हरिदास गळफास लावलेल्या अवस्थेत दिसताच घरच्या मंडळींनी एकच हंबरडा फोडला. याप्रकरणी पोलिसांना सूचित करण्यात आले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे. त्यांनी आत्मघाती पाऊल का उचलले हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्या पश्चात मोठा आप्त परिवार आहे.
वणी: बातमीदार

Previous articleश्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा
Next article‘लायन्स’ च्या दोन्ही संघाचे नेत्रदीपक यश
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.