Home Breaking News त्या….तरुणांने धारदार शस्त्रासह घातला ‘धुमाकूळ’

त्या….तरुणांने धारदार शस्त्रासह घातला ‘धुमाकूळ’

781

गायकवाड फैलातील घटना

सुनील पाटील | महाशिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान 19 वर्षीय तरुणाने धारदार शस्त्रासह (with a sharp weapon) परिसरात धुमाकूळ घातला. पोलिसांना ही बाब कळताच शहरातील गायकवाड फैलात धाव घेत धारदार लोखंडी सत्तुर सह आरोपीला ताब्यात घेतले.

साहील संजय कामटकर (19) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. तो गायकवाड फैल परिसरातील निवासी असून शनिवार दि. 18 फेब्रुवारीला सायंकाळी लोखंडी धारदार सत्तुर हातात घेवुन घुमाकुळ घालत होता. त्याच्या या रौद्ररूपाने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते.

ही गंभीर बाब प्रत्यक्षदर्शींनी वणी पोलिसांना कळवली. ठाणेदार प्रदीप शिरस्कार यांनी तातडीने डीबी पथकाला आदेशीत केले. पोलिसांनी तडक धडक देत आरोपीला जेरबंद केले. त्याचे जवळून लोखंडी धारदार सत्तुर जप्त करण्यात आला असून विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बंसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, SDPO संजय पूजलवार, ठाणेदार प्रदिप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी पथक प्रमुख API माधव शिंदे, सुदर्शन वानोळे, सुहास मंदावार, विठल बुरुजवाडे, हरीन्द्रकुमार भारती, सागर सिडाम, पुरूषोत्तम डडमल यांनी केली.
वणी : बातमीदार

Previous articleपत्रकार प्रशिक्षण शिबिरात नवोदितांचा उत्साही सहभाग
Next articleत्या… तरुणाने का घेतला गळफास…!
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.