● अल्पावधीत मिळवला नावलौकिक
Financial sector news : वणीतील अल्पावधीत नावलौकिक प्राप्त लक्ष्मीनारायण पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संस्थ्येच्या अध्यक्षा व संचालकांनी वर्धापन दिनाचे औचित्य साधुन अभिकर्ता, कर्मचारी व सभासदांना पर्यावरण संतुलन राखल्या जावं याकरीता वृक्षांचे रोपटे देवून वृक्षारोपन व संवर्धन करण्याचा सल्ला दिला. The first anniversary of Lakshminarayan Patsanstha, which gained fame in a short span of time, concluded with much fanfare.
लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था गेल्या एक वर्षात मोठ्या प्रमाणात आर्थिक क्षेत्रात गगन भरारी घेतली असून या संस्थेने सर्वांचा विश्वास कायम करून कमी वेळात नावलौकिक केला आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवून पारदर्शक व्यवहार व सर्वसामान्य जनतेला शेतकरी व महिला बचत गटांना सुद्धा आर्थिक प्रगतीचा हातभार लावण्यासाठी ही संस्था गेल्या एक वर्षापासून सतत काम करत आहे.
प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधुन सर्व अभिकर्त्यांना व कर्मचाऱ्यांना तसेच उपस्थित सभासदांना प्रत्येकी एक झाड वाटप करून झाड लावण्याचा व त्यांना जगवून मोठे करण्याचा संकल्प करण्यात आला. पर्यावरण संतुलन साधण्यासाठी सामाजिक उपक्रम म्हणून सर्वांना झाडांचे वाटप करण्यात आले.
संस्थेच्या पारदर्शकतेमुळे सर्वसामान्य शेतकरी, व्यापारी, उद्योजक व गरजू लोकांना पतपुरवठा करून त्यांच्या व्यवसायाला मोठा हातभार लावत आहे. या पतसंस्थेचा कारभार पाहता सर्वसामान्यांमध्ये कमी वेळात मोठी प्रगती करणारी एकमेव पतसंस्था म्हणून विश्वासास पाञ ठरली आहे. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्षा संगीता संजय खाडे संस्थेचे संचालक संजय रामचंद्र खाडे व ईश्वर खाडे तथा इतर पदाधिकारी अभिकर्ते कर्मचारी व सभासद उपस्थित होते.
Rokhthok News