Home वणी परिसर लायन्स महाविद्यालयात BSC व B com साठी प्रवेश सुरू

लायन्स महाविद्यालयात BSC व B com साठी प्रवेश सुरू

● इमारतीत भव्य क्रीडांगण, सुसज्ज व अत्याधुनिक प्रयोगशाळा, इंटरनेट सुविधासह अद्यावत संगणक कक्ष व उत्कृष्ट लायब्ररी

291

अनुभवी प्राध्यापक, प्रशस्त इमारत

Education News |- वणी लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित वणी लॉयन्स वरिष्ठ महाविद्यालयात अभ्यासकमाला मागील सत्रात मान्यता मिळाली. तसेच चालू शैक्षणीक सत्रात (2023 – 2024) बी.एस.सी. (प्रथम व व्दितीय वर्ष) व बी. कॉम प्रथम वर्ष (इंग्रजी माध्यम) अभ्यासक्रमासाठी सरळ प्रवेश प्रकीया सुरू करण्यात आली आहे. B.Sc. (First and second year) and B. com direct admission process for first year (English medium) course started

प्रवेशा करीता विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणपत्रीका, आधारकार्डची झेरॉक्स प्रत व स्थानांतरण प्रमाणपत्र (T.C.) ची मुळ प्रत प्रवेश अर्जासह संस्थेच्या देशमुखवाडीतील मुख्य कार्यालयात सकाळी 10:30 ते दुपारी 2:30 वाजता दरम्यान जमा करावी. मर्यादीत जागा असल्यामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांनी निराशा टाळावी असे महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

वणी परिसरात सध्या एकच महाविद्यालयात बी.एस.सी. व बी. कॉम. अभ्यासक्रम सुरु आहे. या महाविद्यालयात मर्यादित सीटमुळे तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना नाईलाजाने दुसऱ्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावा लागत होता. त्यामुळे वणी लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मागील वर्षांपासून वरिष्ठ महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे.

वरिष्ठ महाविद्यालयात अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेपेरा मार्गावरील लॉयन्सच्या मालकीची भव्य व प्रशस्त इमारतीत हे महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे. या इमारतीत भव्य क्रीडांगण, सुसज्ज व अत्याधुनिक प्रयोगशाळा, इंटरनेट सुविधासह अद्यावत संगणक कक्ष व उत्कृष्ट लायब्ररी येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

देशमुखवाडी येथे थोडया जागेत सुरू केलेल्या शाळेचा आता चांगलाच विस्तार झाला असून, शाळेच्या देशमुखवाडी, रवी नगर परिसरात व नांदेपेरा मार्गावर शैक्षणीक दृष्टया सुसज्ज व प्रशस्त ईमारती आहेत. यातून नर्सरी ते १२ वी विज्ञान तसेच पदवीचे शिक्षण दिल्याजाते. तसेच संस्थेव्दारा अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.

या पूर्वी वणी परिसरात पदवीचे शिक्षण घेतांना विद्यार्थ्यांना मर्यादीत जागा असल्यामूळे अडचणी येत होत्या व अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचीत रहात होते त्यामुळे वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टने विद्यार्थ्यासाठी संधी उपलब्ध करून दिली या संधीचा लाभ विदयार्थी व पालकांनी घ्यावा असे आवाहन संस्थेने केले आहे

*अधिक माहिती व प्रवेशासाठी*
9049851616, 9881755887, 8999681525