Home Breaking News बेपत्ता शिक्षकाचा मृतदेह पाच दिवसांनी ‘गवसला’

बेपत्ता शिक्षकाचा मृतदेह पाच दिवसांनी ‘गवसला’

● चंद्रपूर जिल्ह्यातील लाठी येथे मिळाली बॉडी

21860

चंद्रपूर जिल्ह्यातील लाठी येथे मिळाली बॉडी

Sad News Wani | जैन लेआऊट परिसरात वास्तव्यास असलेले शिक्षक बुधवार दि. 19 जुलै पासून बेपत्ता होते. त्यांची दुचाकी पटाळा पुलावर आढळून आल्याने विविध तर्कवितर्क वर्तवल्या जात होते. वर्धा नदीपात्रात शोधमोहीम राबविण्यात आली होती मात्र हाती निराशा आली. रविवारी चंद्रपूर जिल्ह्यात गोंडपिंपरी तालुक्यातील लाठी शिवारातील नदीपात्रात मृतदेह आढळून आला. A dead body was found in a riverbed at Lathi in Rajura taluka Chandrapur district on Sunday.

अजय लटारी विधाते (39) असे मृतकाचे नाव आहे ते जैन लेआऊट परिसरातील निवासी होते. तसेच कोरपना तालुक्यातील कोळसी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कर्तव्यावर होते. बुधवार दिनांक 19 जुलैला ते आपल्या घरून सकाळी 9 वाजताच्या दरम्यान दुचाकी घेवून बाहेर पडले. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांची शोधाशोध करण्यात आली.

गुरुवारी पारिवारिक मंडळींनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत रीतसर तक्रार दाखल केली. मात्र काही कालावधीतच पाटाळ्याच्या पुलावर त्यांची दुचाकी आढळून आली. यामुळे काहीतरी विपरीत घडल्याची शंका उत्पन्न झाली.

रविवार दि. 23 जुलैला चंद्रपूर जिल्ह्यात गोंडपिंपरी तालुक्यातील लाठी गावाच्या हद्दीतील वर्धा नदीपात्रात अनोळखी मृतदेह आढळून आला. तेथील स्थानिक पोलिसांनी वणी पोलिसांना सूचित केले. याप्रकरणी मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असून मृतक अजय विधाते असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Rokhthok News