Home Breaking News शेकडो भगीनींनी उंबरकरांना बांधली “राखी”

शेकडो भगीनींनी उंबरकरांना बांधली “राखी”

● 16 वर्षा पासुनची अखंडीत परंपरा

601

16 वर्षा पासुनची अखंडीत परंपरा

Wani news | रक्षाबंधन हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे. हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासुत्र, म्हणजेच राखी बांधते आणि भावाची प्रगती व सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करते. वणी विधानसभा मतदारसंघातील शेकडो भगीनी मागील सोळा वर्षा पासुन मनसे नेते राजु उंबरकरांच्‍या घरी उपस्थित राहुन ही पविञ परंपरा जपताहेत. Since sixteen years, MNS leader Raju Umberkar has been present at his house and is keeping this sacred tradition.

c1_20230831_17585125

मनसे जनसंपर्क कार्यालयात रक्षाबंधन सन उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. राजु उंबरकर व त्‍यांच्‍या पत्‍नी तृप्‍ती यांनी उपस्थित सर्वच भगीनींचे स्‍वागत केले. भावा-बहिणीच्या अतूट नात्याला उजाळा देणाऱ्या, आणि हे नातं आणखी घट्ट करणाऱ्या  ‘रक्षाबंधन’  या सणाच्या शुभेच्छा स्विकारत राखी बांधून घेतली.

रक्षाबंधन या सणाला प्राचीन काळापासून साजरे केले जात आहे. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये रक्षाबंधनच्या उल्लेख केला आहे. समाजात माता-भगिनींना आदरानं वागवलं पाहिजे, समान अधिकार आणि दर्जा दिला पाहिजे, तरंच खऱ्या अर्थानं आजच्या या सणाचं महत्त्व राखलं जाईल, असे मत यावेळी राजू उंबरकर यांनी व्यक्त केले.

c1_20230831_17591915

याप्रसंगी शेकडो भगीनींनी उंबरकरांना शुभाशिर्वाद दिलेत, पुढील राजकीय वाटचाली करीता शुभेच्‍छा देण्‍यात आल्‍या. महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्‍या स्‍थापने पासुन उंबरकर रक्षाबंधन साजरा करताहेत. याप्रसंगी मतदार संघातील शेकडो भगीनी, मनसेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व महाराष्‍ट्र सैनिक मोठया संख्‍येने उपस्थित होते.
ROKHTHOK NEWS