Home Breaking News विषाचा घोट… उपचारादरम्‍यान मृत्‍यू

विषाचा घोट… उपचारादरम्‍यान मृत्‍यू

● शेतकऱ्यांच्या आत्‍महत्‍येने हळहळ

1979
C1 20240122 11492598

शेतकऱ्यांच्या आत्‍महत्‍येने हळहळ

Sad News : तालुक्‍यातील नवेगांव (विरकुंड) येथे वास्‍तव्‍यास असलेल्‍या 55 वर्षीय अल्‍पभुधारक शेतकऱ्यांने विषाचा घोट पोटात रिचवला. सात दिवस मृत्‍यूशी झुंज दिली. अखेर सोमवार दिनांक 22 जानेवारीला सकाळी त्‍यांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. शेतकऱ्यांच्या आत्‍महत्‍येने परिसरात हळहळ व्‍यक्‍त होत आहे. Fought death for seven days. Finally, on Monday 22 January, he died during treatment.

अशोक निळकंठ वैद्य (55) असे मृतक शेतकऱ्यांचे नांव आहे तो आपल्‍या परिवारांसह नवेगांव (विरकुंड) येथे वास्‍तव्‍यास होता. त्‍यांचे जवळ अडीच एकर शेती आहे. शेतीतील उत्‍पन्‍नाच्‍या भरवशावर तो आपल्‍या परिवारांचा उदरनिर्वाह करायचा. यावर्षी शेतातील उत्‍पन्‍न कमी झाले यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते असे त्‍यांच्‍या नातेवाईकांनी सांगीतले.

सावकारी कर्ज आणि बॅकेचे कर्ज कसे भरायचे या विचारात ते सतत असायचे असे बोलल्‍या जात आहे. त्‍यांनी दिनांक 16 जानेवारीला आपल्‍या राहत्‍या घरी कोणीच नसल्‍याची संधी साधून विषारी औषध प्राशन केले. ही बाब घरच्‍या मंडळीना कळताच त्‍यांना येथील ग्रामीण रुग्‍णांलयात उपचारार्थ दाखल करण्‍यात आले होते. प्रकृती गंभीर असल्‍याने त्‍यांना चंद्रपुरला पुढील उपचारार्थ हलविण्‍यात आले.

मागील सात दिवसांपासुन त्‍यांनी मृत्‍यूशी झुंज दिली अखेर सोमवारी सकाळी त्‍यांची प्राणज्‍योत मालवली. त्‍यांचे पश्‍चात आई, वडील, पत्‍नी व दोन विवाहीत मुली आहे. याप्रकरणी पोलीसांना कळविण्‍यात आले असुन उत्‍तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांना सोपविण्‍यात येणार आहे. परंतु अल्‍पभुधारक शेतकऱ्यांच्या आत्‍महत्‍येमुळे गावात शोककळा पसरली आहे.
Rokhthok News