Home Breaking News सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये सांस्कृतिक उडान

सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये सांस्कृतिक उडान

220

विद्यार्थी व पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती

रोखठोक |: येथील स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलच्या प्रांगणात उडान 2023 या थीमवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे सफल आयोजन गुरुवार दिनांक 19 जानेवारी रोजी करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थी व पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.

आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष प्रदिप बोनगिरवार तसेच उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. अनंता सूर यांची उपस्थिती होती. तर विशेष अतिथी म्हणून व्यवस्थापकीय संचालक मोहन बोनगिरवार, शाळेचे प्राचार्य प्रवीण दुबे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर भाषणात प्रा. प्रवीण दुबे यांनी आपल्या प्रभावी भाषण शैलीत वार्षिक अहवाल सादर करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उद्घाटकीय भाषणाद्वारे डॉ. अनंता सूर यांनी विद्यार्थ्यांना यश आणि अपयश यातील फरक सॉक्रेटिसचे उदाहरण देत अतिशय मार्मिकपणे विषद करीत मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात बोलताना संस्थेचे अध्यक्ष प्रदिप बोनगिरवार यांनी पालकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांतील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे महत्त्व मोहन बोनगिरवार यांनी विषद केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर करुन सर्व उपस्थित मान्यवरांचे तसेच पालकांचे मन जिंकले.

उडान सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन इयत्ता 9 वी च्या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
वणी: बातमीदार