Home वणी परिसर महाआरती, लेझर शो आणि फटाक्यांची आतिषबाजी

महाआरती, लेझर शो आणि फटाक्यांची आतिषबाजी

● महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचा पुढाकार

479
C1 20240121 19172608
C1 20240404 14205351

महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचा पुढाकार

Wani News : संपुर्ण देशवासिंयासाठी अभिमानास्‍पद असलेल्‍या अयोध्‍येतील श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा आणि राममूर्तीची प्राण प्रतिष्ठापना सोमवारी होणार आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे पाचशे वर्षानंतर श्री राम मंदिराचे स्वप्न साकार होत आहे. या अभुतपुर्व सोहळयाचे औचित्‍य साधून महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांनी मिरवणूक, होमहवन आदी धार्मिक विधींचे आयोजन केले आहे तर लेझर शो आणि फटाक्यांची शाही आतिषबाजी करण्‍यात येणार आहे. Raju Umbarkar has organized religious ceremonies like Mirvanuk, Homehavan etc.

राम मंदिर उद्घाटन आणि मूर्ती प्रतिष्ठपने निमित्त संपुर्ण वणीशहर भगव्या पताका आणि दिव्यांनी उजळून निघणार आहे. येथील नागरिकांनी देखील आनंदोत्सव साजरा करावा यादृष्टीने भव्‍य महाआरतीचे आयोजन केले आहे. या आनंदोत्सवात सर्व वणीतील नागरिकांनी सहभागी होऊन जल्लोषात आनंदोत्सव साजरा करावा तसेच नागरिकांनी घरासमोर पणती, रांगोळी, भगवा ध्वज उभारून प्रभू श्रीरामाचे स्वागत करावे असे आवाहन करण्‍यात आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणी विभागांत नाविन्यपूर्ण कार्यक्रमाची मालिका चालवत असून, आता या कार्यक्रमाच्या माध्यमांतून शहरांत पहिल्यांदाच लेझर शो आयोजित करण्यात आला आहे. प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठापना निमित्त वणीत लेझर शो, महाआरतीचे आयोजन केले आहे.

या भव्‍य सोहळयाच्‍या पार्श्वभूमीवर आयोजित केलेला लेझर शो वणीकरांना पहिल्यांदाच अनुभवयास मिळणार आहे. तसेच तर या कार्यक्रमादरम्यान मंदिर इतिहासात आपले योगदान दिलेल्या वणी शहरातील कार सेवकांचा व त्यांच्या कुटंबियांचा सत्कार – सन्मान करण्यात येणार आहे. तर या कार सेवकांना या महाआरतीचा मान देण्यात देण्यात येणारं आहे.
Rokhthok News