Home Breaking News अपघातात काका व चिमुकली पुतणी ठार

अपघातात काका व चिमुकली पुतणी ठार

● wcl च्या ट्रकने दिली दुचाकीला धडक

5581
C1 20240404 14205351

wcl च्या ट्रकने दिली दुचाकीला धडक

Accident news | आबई येथे वास्तव्यास असलेले काका व चिमुकली पुतणी शिंदोला या गावी गेले होते. आपल्या गावी परतत असताना कुर्ली ते शिंदोला या मार्गावर सरकार ढाबा जवळ वेकोली च्या दारुगोळा वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. ही घटना रविवारी 7: 30 वाजता घडली यात दोघांचा मृत्यू झाला. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेने परिसर हादरला आहे. The truck hit the bike hard. Both died in this The area has been shaken by this shocking incident.

लावण्या रामचंद्र बलकी (07) व लक्ष्मण दिवाकर बलकी (28 ) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. ते आबई या गावातील निवासी होते. सायंकाळी काका लक्ष्मण याने पुतणी लावण्या हिचे केस कापण्यासाठी शिंदोला येथे आपल्या दुचाकीने नेले होते.

शिंदोला येथील काम आटोपताच ते दुचाकीने गावी परतत असताना सरकार ढाबा जवळच वेकोलीच्या दारुगोळा वाहतूक करणाऱ्या व्हॅन क्रमांक MH- 34- BJ -1778 ने दुचाकीला जबर धडक दिली आणि घटनास्थळी न थांबता त्या वाहनाने पलायन केले.

घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी सूचना निर्गमित केल्या आणि PSI रामेश्वर कांदुरे व पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करत त्या ट्रक ला ताब्यात घेत चालकाला अटक केली आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करताहेत. दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
Rokhthok news

 

Previous articleMay hit..चा तडाखा, वाढली तापमानाची दाहकता
Next articleDysp पुजलवार यांची मुख्यालयात बदली
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.