Home Breaking News तीन गुन्ह्यातील 8 आरोपी ताब्यात

तीन गुन्ह्यातील 8 आरोपी ताब्यात

273
C1 20240404 14205351

* 2 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

* शिरपूर पोलिसांची कारवाई

वणी बातमीदार: शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत असणारे बंदावस्थेतील कारखाने भंगार चोरट्यांच्या निशाण्यावर आहेत. त्या प्रमाणेच निर्मनुष्य ठिकाणी केबलतार व भंगार चोरीच्या गुन्हयात झालेली वाढ पाहता ठाणेदार सचिन लुले यांनी गुन्हे प्रतिबंध व आरोपी अटक करणेबाबत विशेष मोहीम राबवली आहे. तीन पथकाच्या मदतीने 3 गुन्ह्यातील 8 आरोपीना ताब्यात घेत 2 लाख 17 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अक्षय व्यंकटी तलांडे (25), आकाश मल्हारी भगत (29), प्रफुल दिपक गीरी (22), श्रीकांत सुरेश आगदरी (27),  नासिफ निजामुद्दीत शेख (31), महेश वासुदेव दुर्गे (22) हे सर्व रा. घुग्गुस जि चंद्रपूर, सुखदेव केशव झाडे (21) रा. शिंदोला, राजेश मारोती खदरे (28) रा. दहीफळ ता. नेर असे अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत.

शिरपूर हद्दीत कोळसा खाणी तसेच विविध कारखाने आहेत. काही बंदावस्थेत असून त्या कारखान्याचे संचालक योग्य सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करताना दिसत नाही. याचाच लाभ भुरटे चोर दिवसाढवळ्या उचलताहेत. शिरपूर पोलिसात तीन गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणी तांत्रीक व पारंपारीक पध्दतीचा अवलंब करत तिनही गुन्हयातील 8 आरोपीना ताब्यात घेत चोरी गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहने असा एकुण 2 लक्ष 17 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले, पोउपनि राम कांडुरे, प्रमोद जुनुनकर, गुनवंत पाटील, अनिल सुरपाम, विनोद मोतेराव, अंकुश कोहचाडे, गजानन सावसाकडे यांनी पार पाडली आहे.