Home वणी परिसर प्रगतीनगर वासीयांना मिळणार आता शुद्ध पाणी

प्रगतीनगर वासीयांना मिळणार आता शुद्ध पाणी

297

* वॉटर एटीएम चे उद्घाटन

वणी बातमीदार:- प्रत्येक नागरिकांना शुद्ध पाणी मिळावं या करिता नगर परिषदेने पुढाकार घेतला असून प्रगती नगर येथे उभारण्यात आलेल्या वॉटर एटीएम चे आज उद्घाटन करण्यात आले.

शहरातील प्रगती नगर भागात असलेल्या जलकुंभातुन पाणी पुरवठा सुरू आहे. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे या करिता आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी शहरात वॉटर एटीएम उभारण्याचा निर्णय घेतला होता.

17 वॉटर ए टी एम उभारण्या साठी नगर परिषदे ने कंत्राट बोलावले होते. त्यातील 12 वॉटर एटीएम चे काम पूर्ण झाले असून आज त्यांचे उद्घाटन करून नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.

प्रगती नगर येथील जलकुंभा जवळ उभारण्यात आलेल्या वॉटर एटीएम चे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, स्वीकृत नगरसेवक प्रा. महादेव खाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, नगरसेवक राजू भोंगळे, राकेश बुग्गेवार, मंजुषा झाडे सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.