Home वणी परिसर वणीत वधू मेकअप स्पर्धा व सेमिनार

वणीत वधू मेकअप स्पर्धा व सेमिनार

211
C1 20240404 14205351

* ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिलांसाठी सुवर्णसंधी 

वणी बातमीदार:- वणी शहर व परिसरातील ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिलां साठी दि 29 ऑगस्ट ला विवेकानंद शॉपिंग सेंटर येथे वधू मेकअप स्पर्धा व एक दिवसीय सेमिनार चे आयोजन करण्यात आले आहे.

या सेमिनार मध्ये मुंबई येथील अल्का गोविंद, जागतिक पातळीच्या मेकअप आर्टीस्ट यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच घेण्यात येणाऱ्या वधू मेकअप स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहे.

ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिलांसाठी हा सेमिनार सुवर्णसंधी असून जास्तीत जास्त महिलांनी या सेमिनार मध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती साठी नीता अजय शर्मा मेकअप आर्टिस्ट वणी मोबाईल नंबर 9049799779 यांचेशी संपर्क साधावा