Home Breaking News शिवसैनिकांनी जाळला कदमांचा प्रतिकात्मक ‘पुतळा’

शिवसैनिकांनी जाळला कदमांचा प्रतिकात्मक ‘पुतळा’

1358
C1 20240404 14205351

रामदास कदमांच्या वक्तव्याचा वणीत निषेध

वणी :- शिंदे गटात सहभागी झालेले माजी मंत्री रामदास कदम यांनी उध्दव ठाकरे यांचे वर केलेल्या आक्षेपार्ह विधानाने शिवसैनिक संतप्त झाले आहे. बुधवारी वणी येथील शिवसैनिकांनी रामदास कदम यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला आहे.

महाराष्ट्रात झालेल्या सत्तातरा नंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेना ठाकरे व शिंदे अशा दोन गटात विभागल्या गेली आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांवर पातळी सोडून आरोप प्रत्यारोप केले जात आहे.

दापोली येथील सभेत माजी मंत्री रामदास कदम यांची जीभ घसरली. त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिकात संतापाची लाट पसरली आहे.

बुधवारी वणी येथील शिवाजी पुतळ्या समोर जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात शिवसैनिकांनी रामदास कदम यांचा पुतळा जाळून रोष व्यक्त केला. तसेच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, चंद्रकांत घुगुल, सुनील कातकडे, शहर प्रमुख सुधीर थेरे, गणपत लेडांगे, विक्रांत चचडा, संजय आवारी, महेश चौधरी, राजू देवडे, प्रशांत बलकी, रिंकू पठाण सह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.

वणी: बातमीदार