Home Breaking News धक्कादायक! दुचाकीच्या धडकेत युवक ठार

धक्कादायक! दुचाकीच्या धडकेत युवक ठार

4355
C1 20240404 14205351

संतधाम समोरील घटना

कायर मार्गावर असलेल्या संतधाम समोरुन दुचाकीने जात असलेल्या युवकाला ‘बुलेट’ दुचाकीने धडक दिली. या जबर अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी 4 वाजताचे सुमारास घडली.

पवन मेश्राम (32) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तो लगतच असलेल्या गणेशपूर येथील रहिवाशी आहे. दुपारी 4 वाजताचे सुमारास दुचाकी क्र MH- 29- BB- 0744 ने जात असतांना त्याच्या दुचाकीला संतधाम समोरच बुलेट ने जबर धडक दिली.

परस्परविरोधी दुचाकीच्या अपघातात पवन ला गंभीर दुखापत झाली. अति रक्तस्राव झाला, यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळावर पोलीस कर्मचारी पोहचले आहेत.
वणी: बातमीदार