Home वणी परिसर रस्त्यासाठी युवक काँग्रेस आक्रमक

रस्त्यासाठी युवक काँग्रेस आक्रमक

511

● 28 मार्चला रस्तारोको चा इशारा

वणी :- चिखलगाव ते लालपुलीया या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा निवेदन देऊनही या मार्गाने काम सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे युवक काँग्रेस ने आक्रमक पवित्रा घेतला असून 28 मार्चला या मार्गावर रास्तारोको करत असल्याचे निवेदन युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पलाश बोढे यांनी दिले आहे.

वणी परिसरात असलेल्या कोळसा खाणी मुळे ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे अनेक रस्त्याची दयनीयअवस्था झाली आहे. वणी यवतमाळ मार्गावर असलेल्या चिखलगाव ते लालपुलिया पर्यंतचा मार्ग पूर्णतः उखडल्या गेला आहे. या मार्गावरून वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

मार्गावर पडलेल्या खड्डयामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. या मार्गावरून कोळशाने भरलेले वाहन ये जा करीत असल्याने रस्त्याची चाळणी झाली आहे. या बाबत युवक काँग्रेस चे वणी विधानसभा उपाध्यक्ष पलाश बोढे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार कळविले आहे. मात्र बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला असून दि 28 मार्च ला या मार्गावर रस्तारोको करून वाहतूक रोखणार असल्याचा इशारा उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

निवेदन देतांना प्रदीप खेकारे, जितेश पुनियाला, सुमित वरारकर, विकी परगंटीवार, अशोक नागभीडकर सह कार्यकर्ते उपस्थित होते.

वणी : बातमीदार

Previous articleशिवजयंती साठी शिवतीर्थ सजले
Next articleअल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम अटकेत
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.