Home Breaking News ध्येयवेडी ‘प्रणाली’ सायकल ने करणार भारत भ्रमण

ध्येयवेडी ‘प्रणाली’ सायकल ने करणार भारत भ्रमण

763
C1 20240404 14205351

60 दिवसात 4500 किलोमीटर भ्रमंती

रोखठोक | पर्यावरण रक्षणासाठी अविरतपणे झटणारी प्रणाली पुन्हा सायकल ने भारत भ्रमण करणार आहे. तिच्या संकल्पसिद्धीला हिरवी झेंडी दाखवून संजय खाडे व संगीता संजय खाडे यांनी मनस्वी पाठिंबा दर्शवला.

प्रणाली विठ्ठल चिकटे ही बालिका तालुक्यातील पुनवट येथील निवासी आहे. तिने यापूर्वी पर्यावरण रक्षणार्थ सायकल ने महाराष्ट्र पिंजून काढला. आता तिचे लक्ष्य भारत भ्रमणाचे आहे. 60 दिवसात साडेचार हजार किलोमीटर चा प्रवास ती सायकलने पूर्ण करणार आहे.

वणी ते नागपूर, मध्य प्रदेश, झांसी, दिल्ली, जम्मू- काश्मीर ते लेह लद्दाख पर्यंतचा टप्पा पार पडणार आहे. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास थांबविण्यासाठी तिची चाललेली धडपड वाखाणण्याजोगी आहे. पर्यावरण हीच आपली संपत्ती असल्याचे मत तिने व्यक्त केले आहे.

गुढीपाडवा या शुभदिनाचे औचित्य साधून तिने भारत भ्रमनाला सुरुवात केली. येथील टिळक चौकात रंगनाथ स्वामी अर्बन निधीचे अध्यक्ष संजय खाडे व लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा संगीता संजय खाडे यांनी हिरवी झेंडी दाखवत संपूर्ण प्रवास सुखी व लोकांच्या जनकल्याणासाठी आदर्श ठरावा अशी मनोकामना व्यक्त केली. तसेच आर्थिक मदत सुध्दा करण्यात आली. याप्रसंगी वणीतील व परिसरातील जनता व चाहते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
वणी : बातमीदार