Home Breaking News महिलेने गळफास लावून संपवले जीवन

महिलेने गळफास लावून संपवले जीवन

2925

विठ्ठल वाडी परिसरातील घटना

रोखठोक | शहरातील विठ्ठलवाडी परिसरात वास्तव्यास असलेल्या 47 वर्षीय विधवा महिलेने गळफास लावून जीवन संपवल्याची घटना बुधवार दि. 22 मार्चला उघडकीस आली.

रश्मी शरद हस्तक (47) असे मृतक महिलेचे नाव आहे. ती विधवा होती तसेच परिवाराच्या पालनपोषणासाठी ती खाजगी नोकरी सुध्दा करत होती. तिने साडीच्या साह्याने घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली.

ही बाब लक्षात येताच पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. तिच्या पश्चात एक मुलगी असून तिने आत्महत्येसारखे पाऊल का उचलले हे कळू शकले नाही. पुढील तपास पोलीस करताहेत.
वणी: बातमीदार