Home Breaking News त्या… अपघातात डॉक्टर पती-पत्नी ठार, चिमुकले बाळ झाले पोरके

त्या… अपघातात डॉक्टर पती-पत्नी ठार, चिमुकले बाळ झाले पोरके

● भीषण घटनेने पसरली शोककळा

8835

भीषण घटनेने पसरली शोककळा

रोखठोक | वरोरा शहरालगत भरधाव ट्रकने वणीकडे येत असलेल्या कारला समोरासमोर जबर धडक दिली. या घटनेत कार चालक महिला डॉक्टरचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर शेजारी बसलेले त्यांचे डॉक्टर पती यांना उपचारार्थ नेत असताना भद्रावती जवळ मृत्यू झाला. ही मनसुन्न करणारी घटना बुधवारी दुपारी तीन वाजता घडली. The car driver, a female doctor, died on the spot, while her doctor husband, who was sitting next to her, died near Bhadravati while taking her husband for treatment.

डॉ. अश्विनी गौरकार- झाडे (31) व डॉ. अतुल गौरकार (34)(Dr. Ashwini Gaurkar- Zade (31) and Dr. Atul Gaurkar (34)) असे मृतक दाम्पत्याचे नाव आहे. ते दोघे आपल्या चिमुकल्या बाळाला घरी आई वडीलाजवळ ठेवून वरोरा येथे स्वतःच्या चारचाकी वाहन क्रमांक MH-34- AM- 4240 ने गेले होते. दुपारी गावी वणीला परतत असताना काळाने घाला घातला.

वरोरा हायवे( Varora Highway) वर विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रक क्रमांक MH- 34- BZ- 2996 ने समोरासमोर जबर धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, कार तब्बल अर्धा किलोमीटर ट्रकने खेचत नेली. या घटनेत डॉ. अश्विनीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असल्याने डॉ. अतुल यांना उपचारार्थ हलविण्यात आले होते.

चंद्रपूरला नेत असताना भद्रावती जवळ डॉ. अतुल यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह सुद्धा वरोरा येथील रुग्णालयात आणण्यात आला आहे. उत्तरीय तपासणी नंतर दोघांचे मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात येणार आहे. दोघांचे नातेवाईक वरोरा येथे पोहचले असून त्यांचेवर अंत्यसंस्कार चंद्रपूरला की वणी येथे होणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

डॉ. अश्विनी व डॉ. अतुल यांना दीड वर्षाचे चिमुकले बाळ आहे. बाळ वणीतच आजी आजोबा जवळ असल्याने बचावले मात्र ते माता पित्याच्या आधारापासून पोरके झाले आहे. होतकरू तरुण डॉक्टर दाम्पत्याच्या अनपेक्षित एक्झिट मुळे कमालीची शोककळा पसरली आहे.
वणी: बातमीदार