Home वणी परिसर विकासाचा झंझावात…कल्‍याणकारी योजना पोहचविणार घराघरात

विकासाचा झंझावात…कल्‍याणकारी योजना पोहचविणार घराघरात

● आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांची ग्‍वाही

561
C1 20240404 14205351

आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांची ग्‍वाही

Wani News | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 9 वर्षाचा यशस्‍वी कार्यकाळ पुर्ण झाला. याचे औचित्‍य साधुन भाजपा महा जनसंपर्क अभियान राबवत आहे. वणी विधानसभा मतदारसंघात 30 मे ते 30 जुन पर्यंत सरकारच्‍या कल्‍याणकारी योजना, राष्‍ट्र विकासाचा झंझावात घराघरात पोहचविण्‍याची ग्‍वाही पञ परिषदेत आ. संजिवरेडडी बोदकुरवार यांनी दिली. BJP is conducting Maha Public Relations campaign in Wani Vidhan Sabha.

कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांचे आर्थिक स्‍ञोत वाढावे याकरीता महत्‍वपुर्ण योजना मोदी सरकारने अमलात आणल्‍या आहेत. नऊ वर्षांच्‍या कालखंडात खताच्‍या किमती स्थिर आहे, सरकारने दरवाढ केली नाही. खताचा पुरेसा साठा उपलब्ध केल्‍याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जागतीक स्‍तरावरील पहील्‍या सुक्ष्‍म द्रव युरीया प्रकल्‍पाची उभारणी सरकारने केली आहे. विविध योजना कार्यान्वित करत शेतकऱ्यांना स्‍वाभीमानाने जगण्‍याची दिशा दाखवली आहे.

देशात शेकडो योजनांच्‍या माध्‍यमातुन गोरगरीबांचे कल्‍याण करण्‍यात सरकारला यश मिळाले आहे. 3.5 करोड पेक्षा जास्‍त कुटूंबियाना पक्‍के घर,  ग्रामिण भागात 11.72 करोड शौचालय निर्माण करत 2023 पर्यंत शंभर टक्‍के उदिष्‍ट पुर्ण करण्‍याची सरकारने हमी घेतली आहे. 12 करोड नळाला पाणी, 9.6 करोड मोफत गॅस कनेक्‍शन, 74 नविन विमान तळाची निर्मीती यामुळे देशाच्‍या व्‍यापार, उद्योगात भर पडली आहे.

देशातील उदात्‍त संस्‍कृतीचे जतन, संवर्धन करण्‍याचे महान कार्य सरकारने केले आहे. जनतेचे श्रदधास्‍थान असलेले मर्यादा पुरूषोत्‍तम श्रीरामाचे मंदीर पुर्ण होत आहे. हा देशातील जनतेच्‍या भावनांचा व धार्मीक पंरपंराचा मोठा सन्‍मान आहे. मोदी यांनी देशाच्‍या सर्वांगिण विकासात महत्‍वपुर्ण योगदान दिले आहे. त्यांचे योगदान व विकासपर्व जनतेपर्यंत पोहचविण्‍याची जबाबदारी सगळयांची आहे. याकरीता महा जनसंपर्क अभियानात मोठया संख्‍येने सहभागी व्‍हावे, असे आवाहन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले आहे.

यावेळी माजी नगराध्‍यक्ष तारेंद्र बोर्डे, विजय पिदुरकर, रवि बेलुरकर, महादेव खाडे, अशोक सुर, संतोष डंभारे, संजय पिपंळशेंडे, गजानन विधाते, नितीन वासेकर व भाजपा कार्यकर्ते उपस्‍थीत होते.
Rokhthok News