Home क्राईम कुलूपबंद घर चोरट्याने फोडले

कुलूपबंद घर चोरट्याने फोडले

527
C1 20240404 14205351

* रवी नगर मधील घटना

* 67 हजाराचा ऐवज लंपास

वणी बातमीदार: रवी नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या वेकोली कर्मचाऱ्यांच्या कुलूपबंद घरी शनिवारी मध्यरात्री चोरट्यानी चोरी केली. सोन्याच्या ऐवजासह रोख रक्कम असा एकूण 67 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

रमेश गणपत भगत हे परिवारासह रवीनगर परिसरात राहतात तसेच ते वेकोलीत कामाला आहेत. रक्षाबंधन निमित्ताने वर्धा जिल्ह्यातील खापरी या गावी सहपरिवार गेले होते. घर कुलूपबंद असल्याने चोरट्यानी मध्यरात्री घराचे कुलुप तोडुन आत प्रवेश केला. बेडरूम मधील कपाटात असलेले सोन्याचे दागिने यात डोरले, मंगळसूत्र, अंगठी व 12 हजार रोख असा एकूण 67 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

रविवारी सकाळी शेजारी राहणाऱ्यांना चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी भगत यांना सूचित केले. दुपारी घरमालकाने घराची पाहणी करून थेट पोलिसात रीतसर तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भादवि कलम 457, 380 अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.