Home Breaking News रासा शिवारात कोंबड बाजारावर ‘धाडसत्र’

रासा शिवारात कोंबड बाजारावर ‘धाडसत्र’

1093
Img 20240613 Wa0015

5 आरोपी ताब्यात, 4 झुंजीचे कोंबडे व 3 दुचाक्या जप्त

वणी: रासा शिवारातील जंगलात लपूनछपून कोंबड बाजार सुरू असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार शाम सोनटक्के यांना मिळाली होती. क्षणाचा विलंब न करता डीबी पथकाला धाडसत्र अवलंबण्याच्या सूचना देण्यात आल्या. बुधवार दि. 22 सप्टेंबर ला दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान 5 आरोपीना ताब्यात घेत 4 झुंजीचे कोंबडे व 3 दुचाक्या जप्त करण्यात आल्या असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शंकर महादेव वरपटकर (43), प्रकाश उर्फ भद्या नामदेव पेचे (36), मदन बापूराव बोबडे (30), देवराव शामराव अस्वले (60) व बापूजी नामदेव तांदुळकर(62) अशी अटकेतील आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी आरोपींची संख्या वाढणार असल्याचे बोलल्याजात असून पोलिसांचा तपास त्या दिशेने सुरू आहे.

तालुक्यात कोंबड बाजाराचे चांगलेच फॅड आहे. कोंबड्याच्या झुंज लावून हरजित केल्या जाते. कोंबड बाजार भरवणारे चांगलेच निष्णात असून जंगलसदृश्य परिसरात आपले बस्तान बसवतात. ज्या ठिकाणी कोंबड बाजार भरवण्यात येतो ती जागा जुगाऱ्याना लगेचच माहीत होते. त्या ठिकाणाला यात्रेचे स्वरूप येवून लाखो रुपयांची उलाढाल या जुगारातून होत असल्याचे बोलल्या जाते. 

पोलीस प्रशासनाने वेळोवेळी अवैधधंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी सतर्क राहिल्यास याचा बिमोड करता येतो. रासा जंगल परिसरात काही लोक कोंबड्यांच्या झुंजी लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच वणी पोलसानी खातरजमा केली आणि मालवाहू पिकअप वाहनात बसून कोंबड बाजार सुरू असलेल्या ठिकाणी धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळी पळापळ सुरू झाली या झटापटीत दोन पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. एकाचा पाय मुरगळला तर दुसऱ्याच्या हाताला काती लागली आहे. या घटनेत तब्बल 1 लाख 50 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर पाच आरोपीवर महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांचे मार्गदर्शनात ठाणेदार शाम सोनटक्के, डीबी पथक प्रमुख सपोनि आनंद पिंगळे, वासू नारनवरे, अनंता इरपाते, अशोक टेकाडे, पंकज उंबरकर, दीपक वंडर्सवार, हरींद्रकुमार भारती, विशाल गेडाम, वसीम शेख, शंकर चौधरी यांनी केली.

C1 20240529 15445424
Previous articleओबीसी आक्रमक, तहसील समोर निदर्शने
Next articleडॉ. पुंड यांचा गणेशोत्सवात सत्कार
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.