Home Breaking News दुःखद…..हर्षल ची अनपेक्षित ‘एक्झिट’

दुःखद…..हर्षल ची अनपेक्षित ‘एक्झिट’

1738

होतकरू तरुणाचे अकाली निधन

वणी: अवघ्या तेहत्तीसाव्या वर्षी अल्पशा आजाराने जगाचा निरोप घेणाऱ्या हर्षल च्या अनपेक्षित ‘एक्झिट’ने शहरात शोककळा पसरली आहे. होतकरू तरुणाचे अकाली निधन मनाला चटका लावणारे आहे. ही दुःखद घटना बुधवार दि. 21 सप्टेंबर ला चंद्रपूर येथे घडली.

हर्षल विजय डाखरे (33) असे त्या अभागी तरुणाचे नाव आहे. एस. पी. एम. विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य विजय डाखरे यांचे सुपुत्र आहेत. कुशाग्र बुद्धिमत्तेचा धनी असलेला हर्षल सीए (Chartered accountant) होता. अतिशय मनमिळाऊ आणि विनम्र असलेल्या हर्षलची अनपेक्षित ‘एक्झिट’ पारिवारिक मंडळी, नातेवाईक व मित्रमंडळी यांना शोकसागरात बुडावणारी आहे.

(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)