Home Breaking News शाळेच्या इमारतीची दुरावस्था, वेकोलीची (wcl) अनास्था

शाळेच्या इमारतीची दुरावस्था, वेकोलीची (wcl) अनास्था

719
C1 20240404 14205351
पुनर्वसन केलेल्या गावाचे हाल चव्हाट्यावर

वणी | तब्बल 25 वर्षांपूर्वी वेकोलीने पुनर्वसन केलेल्या गावांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यात वेकोली प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहेत. पुनर्वसित बेलोरा गावातील रस्ते, शाळेची इमारत याची स्थिती प्रचंड बिकट असून वेकोलीची अनास्था उजागर होत आहे.

वेकोली खाण क्षेत्रातील पुनर्वसित बेलोरा गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. भिंतीला भेगा पडल्या असून पावसाळ्यात छतातून पाणी टपकत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शाळेची जीर्ण इमारत केव्हाही धाराशाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कोणतीही अनुचित प्रकार घडू नये याची वेळीच खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे.

वेकोली प्रशासनाने तातडीने निर्णय घेत शाळेची इमारतीचे नव्याने बांधकाम करावे व मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात. अशा स्वरूपाची मागणी ग्रामस्थांसह शिवसेना उप जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांनी उप महाप्रबंधक अतुल सिंह यांना निवेदनातून केली आहे. अन्यथा 10 ऑक्टोबर पासून बेलोरा चेक पोस्ट वरून कोळशाचा एकही ढेला बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा दिला आहे.
वणी: बातमीदार