Home क्राईम चोरीला गेलेला ऐवज फिर्यादीला केला परत

चोरीला गेलेला ऐवज फिर्यादीला केला परत

● न्यायालयाचा आदेश, शिरपुर पोलीसांची कारवाई

1338

न्यायालयाचा आदेश, शिरपुर पोलीसांची कारवाई

Crime News Wani | शिरपुर पोलीस स्‍टेशन हद्दीतील पुरड (नेरड) येथे दिनांक 24 ऑगष्‍टला भरदिवसा घरफोडी करुन चोरट्यांने डाव साधला होता. तक्रारीअंती शिरपुर पोलीसांनी अवघ्‍या काही तासातच आरोपींच्‍या मुसक्‍या आवळल्‍या होत्‍या तर मुददेमाल जप्‍त करण्‍यात आला होता. याप्रकरणातील ऐवज न्‍यायालयाच्‍या आदेशाने फिर्यादीला गुरुवार दिनांक 22 सप्‍टेंबरला परत करण्‍यात आला आहे. The Shirpur police arrested the accused in just a few hours.

तालुक्‍यातील पुरड (नेरड) येथे वास्‍तव्‍यास असलेल्‍या देवराव मारुती थेरे (35) यांचे घरी दिनांक 24 ऑगष्‍ट ला दुपारी 11 ते 4 वाजताच्‍या दरम्‍यान अज्ञात चोरट्याने दाराचे कुलूप तोडुन बेडरुम मधील लोखंडी कपाटातुन सोने चांदीचे दागिने तसेच नगदी 15 हजार रुपये लंपास केले होते. याप्रकरणी शिरपुर पोलीसांत शुक्रवारी रितसर तक्रार नोंदविण्‍यात आली होती.

तात्‍कालीन ठाणेदार सपोनि गजानन करेवाड, पोलीस उप निरिक्षक रामेश्‍वर कांडूरे व पोलीस कर्मचाऱ्यांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवत गावातीलच नवख्‍या चोरट्यांना अवघ्‍या काही तासातच जेरबंद केले होते. अमोल सोमेश्वर भटवलकर (32) व प्रफुल देवीदास मोहीतकर (26) असे त्यांची नांवे. त्‍याचे जवळून पोलीसांनी तीन सोन्‍याच्‍या अंगठया, डोरले मंगळसुञ, नेकलेस, सोन्‍याचा गोफ, चांदीचे पैजन व 15 हजार रुपये रोकड असा एकुन 1 लाख 97 हजार रुपयांचा मुददेमाल हस्‍तगत केला होता.

चोरी प्रकरणी पोलीसांनी गुन्‍हा नोंद करुन चोरट्यांना अटक केली होती. तर मुददेमाल हस्‍तगत करण्‍यात आला होता. याबाबत न्‍यायालयाने आदेशीत करत फिर्यादी देवराव मारुती थेरे यांना मुददेमाल सुपूर्द करण्‍याचे सुचविले होते. यान्‍वये ठाणेदार सपोनि संजय राठोड, पोउनि रामेश्‍वर कांडूरे यांनी 1 लाख 85 हजार रुपयांचे सोन्‍या चांदीचे दागीने व 12 हजार रुपये रोख असा एकुन 1 लाख 97 हजाराचा ऐवज फिर्यादीच्‍या ताब्‍यात दिला आहे.
ROKHTHOK NEWS

Previous articleधडाका…. समाज भवनासाठी दोन कोटी
Next articleदुःखद….सुनील चोपणे यांचे निधन
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.