Home Breaking News dead body : वरोरा महामार्गावर आढळला मृतदेह

dead body : वरोरा महामार्गावर आढळला मृतदेह

● मृतक अज्ञात, अपघात की घातपात ● पोलीस ओळख पटविण्यासाठी प्रयत्नरत

2155
C1 20231022 21281722

मृतक अज्ञात, अपघात की घातपात
पोलीस ओळख पटविण्यासाठी प्रयत्नरत

Sad News Wani | वणी वरोरा महामार्गावर सार्वला शिवारातील पुलाजवळ अंदाजे 40 ते 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. ही बाब शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर ला सायंकाळी 6: 30 वाजता उघडकीस आली. वणी पोलीस मृतकांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करताहेत. Wani police are trying to identify the deceased.

सार्वला शिवारातील पुलाजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. तो व्यक्ती कोण याचा तपास पोलीस प्रशासन करताहेत. मृतक काळ्या रंगाची पॅन्ट परिधान करून आहे तर कथिया रंगाची अंडर पॅन्ट घातलेला आहे. त्याच्या उजव्या हातावर धागा बांधलेला आहे. तसेच छाती व पोटाच्या मध्ये तिळाचे निशाण आहे.

सार्वला शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळताच प्रत्यक्षदर्शींनी वणी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अज्ञात व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी लगतच्या अन्य पोलीस ठाण्यात कळवण्यात आले. तो नेमका अपघात की घातपात  हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गजानन होडगीर विस्तृत तपास करत आहे.
Rokhthok News