Home Breaking News विषाचा घोट : 38 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

विषाचा घोट : 38 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

● शुक्रवारी सकाळी उघडकीस आली घटना

2141
Image Search 1703240621553

शुक्रवारी सकाळी उघडकीस आली घटना

Sad News Wani : मुकुटबन पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या खातेरा येथील 38 वर्षीय व्यक्तीने विष प्रश्न करून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार दिनांक 22 डिसेंबरला सकाळी 10 वाजता उघडकीस आली. A 38-year-old man committed suicide by questioning poison

सुनील दादाजी टेकाम (38) असे मृतकाचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह खातेरा येथे वास्तव्यास होता. मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा गाडा हाकत असताना त्याला नैराश्याने ग्रासले आणि त्याने आपल्या राहत्या घरातच विषारी द्रव प्राशन करून जीवन संपवले.

घटनेच्या बाबत घरच्या मंडळींना कळताच त्यांनी तातडीने पोलिसांना सूचित केले व रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. वणी येथील ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आले आहे. त्याने विषाचा घोट पोटात का रिचवला हे स्पष्ट झाले नाही. पुढील तपास मुकूटबन पोलीस करताहेत.
Rokhthok News