Home Breaking News पोलिसांचे वेशांतर आणि कोंबड बाजारावर धाड

पोलिसांचे वेशांतर आणि कोंबड बाजारावर धाड

1781

आठ जुगारी ताब्यात, दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

रोखठोक | शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येनक शिवारात कोंबड बाजारावर पोलिसांनी वेशांतर करून धाड टाकली. यावेळी आठ जणांना ताब्यात घेण्यात आले तर त्यांच्या जवळून दोन लाख 15 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवार दि.22 जानेवारीला सायंकाळी करण्यात आली.

येनक जवळील जंगलात कोंबड बाजार सुरू असल्याची खात्रीलायक बातमी ठाणेदार सपोनि गजानन करेवाड यांना मिळाली. त्यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी पोलीस उप निरीक्षक रामेश्वर कांडुरे व पथकासह वेशांतर करून सापळा रचला.

येनक शिवारातील जंगलात खाजगी वाहनाने दोन पंचासह पोलिसांनी शिरकाव केला. काही इसम गोलाकार रिंगण करून कोंबड्याच्या झुंजी लावून हार-जीत करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी लगेचच धाड सत्र अवलंबत त्या सर्व जुगाऱ्याना ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत केला.

बंडु लक्ष्मन वाघाडे (48) रा. कुरई, सचीन नागोबा बोराडे (32) रा. गोवारी, महेश संग्राम सरोज (49) अमराई वार्ड घुग्गुस जि.चंद्रपुर, गणेश दीलीप बांदुरकर (35), शंकर नामदेव बरडे (32), आकाश यादव धंदरे (21), संकेत रवींद्र खारकर (20) हे चौघे रा. शेणगाव जि. चंद्रपुर व अजय आकुलवार (38) रा. सावंगी अशा आठ आरोपींना ताब्यात घेत त्यांचे जवळून मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधीकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनात सहा पोलीस निरीक्षक गजानन करेवाड, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे, सुनील दुबे, गजानन सावसाकळे, पाटील, विजय फुलके यांनी केली.
वणी: बातमीदार