Home Breaking News विषाचा घोट, उपचारादरम्यान मृत्यू

विषाचा घोट, उपचारादरम्यान मृत्यू

1293

मारेगाव तालुक्यातील घटना

रोखठोक | मारेगाव तालुक्यातील आत्महत्येची शृंखला थांबता थांबेना. गुढीपाडव्याच्या दिवशी 35 वर्षीय तरुणाने किटकनाशक प्राशन करून आपले जीवन संपवले. ही घटना बुधवार दि. 22 मार्चला दुपारी तीन वाजता उघडकीस आली.

प्रवीण महादेव खिरटकर (35) असे मृतकाचे नाव आहे तो चोपण येथील निवासी होता. तो मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. त्याचे वडिलांच्या नावे तीन एकर शेती असल्याचे समजते. मागील काही काळापासून उत्पादनात घट होत असल्याने तो आर्थिक विवंचनेत होता.

घटनेच्या दिवशी तो नेहमीप्रमाणे शेतीपयोगी कामासाठी सकाळी शेतात गेला होता. काहीवेळाने त्याने गोठ्यात ठेवलेले कीटकनाशक प्राशन केले. दुपारी त्याचा भाऊ शेतात आला असता त्याला निपचित पडलेला प्रवीण दिसला. त्याने आरडाओरडा केला आणि तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

प्रवीण ची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचाराठी वणी येथे हलविण्याचा सल्ला दिला. मात्र वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मारेगाव पोलीस पुढील तपास करीत आहे.
वणी: बातमीदार