Home Breaking News स्टोव्हचा भडका, वृद्ध महिला मृत

स्टोव्हचा भडका, वृद्ध महिला मृत

● लालगुडा परिसरातील घटना

1385

लालगुडा परिसरातील घटना

burns news| वृद्ध दाम्पत्य लालगुडा परिसरात वास्तव्यास होते. सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान स्टोव्हचा अचानक भडका उडाला यात 60 वर्षीय वृद्धा भाजल्या गेल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. A 60-year- old woman died on the spot due to burns when the stove suddenly caught fire.

पोर्णिमा अरुण चक्रवती (60) असे दुर्दैवी मृतक वृद्धेचे नाव आहे. ती पती अरुण यांचेसह लालगुडा येथे भाडेतत्त्वावर लहान खोली घेऊन वास्तव्यास होती. ती स्वयंपाक करत असताना अचानक स्टोव्ह चा भडका उडाला.

लागलेल्या आगीने त्या वृद्धेला कवेत घेतले यात तिचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली. बिट जमादार दिगांबर किनाके यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. मृतदेहाची पाहणी करून उत्तरीय तपासणी करिता शव पाठवण्यात आले. मंगळवारी शव विच्छेदना नंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आले.
Rokhthok News