Home Breaking News मानवतेला काळिमा फासणारी घटना, तीव्र निषेध

मानवतेला काळिमा फासणारी घटना, तीव्र निषेध

● मणिपूर प्रकरणी वणीत रॅली

1098
C1 20240404 14205351

मणिपूर प्रकरणी वणीत रॅली

Wani News | ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात मागील तीन महिन्यापासून यादवी सुरु असून हिंसाचार होताहेत. निरपराध लोक, वृद्ध, लहान बालके, स्त्रिया अशा अनेकांना नाहक जीव गमवावे लागत असतानाच मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. संताप आणि चीड आणणाऱ्या त्या घटनेचा वणीत तीव्र निषेध करत रविवारी सकाळी 11 वाजता भव्य रॅली काढण्यात आली. Violence has been going on for the past three months in Manipur state of Northeast India.

समाजमाध्यमातून प्रसारित झालेली मानवतेला काळिमा फासणारी घटना मणिपूर राज्यात घडली. स्त्रियांवर बलात्कार करून नग्न धिंड काढलेला तो व्हिडीओ समाजमन सुन्न करणारा आहे तर संताप आणि चीड निर्माण करणारा आहे. संपूर्ण देशात या घटनेचे गंभीर पडसाद उमटत असून वणीत सुद्धा तीव्र निषेध करण्यात आला आहे.

c1_20230723_17080030

जाहीर निषेध रॅलीत जिजाऊ ब्रिगेड,राणी दुर्गावती आदिवासी संघटना, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, धनगर समाज संघटना,परीट समाज संघटना, बिरसा ब्रिगेड, तेली समाज संघटना, मुस्लिम संघटना,बौद्ध समाज संघटना,ओबीसी समाज संघटना,सेवानिवृत्त शिक्षक संघटना,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती, महिला बचत गट, छत्रपती संभाजी महाराज बचत गट, बसपा, युवा महिला सेना यांसह अनेक संघटना उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरुवात करून महात्मा गांधी चौक, रविंद्रनाथ टागोर चौक आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गे ही निषेध रॅली झाली. दरम्यान मणिपूर सरकार, केंद्र सरकारच्या विरोधात दिलेल्या घोषणांनी संपूर्ण वणी परिसर दणाणून सोडला.

स्त्रियांची नग्न धिंड काढणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करून फाशी देण्यात यावी, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी आग्रही मागणी देशाच्या राष्ट्रपतीकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवलेल्या निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली.

याप्रसंगी आशा कोवे, लता मडावी, माया पेंदोर, माया आसुटकर, सरिता घागे, छाया वागदरकर, सोनाली जेणेकर, वसुधा ढाकणे, स्वप्ना पावडे, हर्षदा चोपणे, सीमा पोटदुखे, पूनम भोयर, सुनिता वागदरकर, जयश्री मानकर, रेखा बोबडे, नीलिमा काळे, किरण नांदेकर, किरण गोडे, विशाखा चौधरी, मीनाक्षी टोंगे, सीमा डोहे, निशा खामनकर ह्या महिला सहभागी झाल्या होत्या.

तर नत्थू नगराळे, अंबादास वागदरकर, अजय धोबे, नितीन मोहितकर, अमोल टोंगे, वसंत थेटे, विनोद बोबडे, मंगेश खामनकर, दत्ता डोहे, नितीन मोवाडे, प्रविण खंडाळकर, रवी चांदणे, शैलेश राऊत, विनोद बल्की, ईश्वर राऊत, दिगंबर ठाकरे, देवेंद्र खरवडे, प्रविण खानझोडे, भास्कर कुमरे, कृष्णदेव विधाते, विलास शेरकी, प्रदिप बोरकुटे, अशोक चौधरी, दत्ता पुलेनवार, अशोक पिंपळशेंडे, सुभाष पाचभाई, वैभव ठाकरे, नामदेव जेणेकर आणि शेकडो वणीकरांनी सहभाग नोंदवला.
Rokhthok News