Home Breaking News अवैद्य दारू विक्रेत्यांची महिलेला मारहाण

अवैद्य दारू विक्रेत्यांची महिलेला मारहाण

1574
C1 20240404 14205351

मेंढोली येथील घटना

वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मेंढोली या गावी अवैद्य दारू विक्रेत्यांनी तक्रारकर्त्या महिलेला मारहाण केली. या प्रकरणी चार दारू विक्रेत्यांवर विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विशाल भावराव चांदेकर (25), मयूर पुरुषोत्तम कावडे (25), पुरुषोत्तम लक्ष्मण कावडे (54), भाऊराव भानुदास चांदेकर (55) हे सर्व राहणार मेंढोली असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दारू विक्रेत्यांची नावे आहेत.

मागील काही दिवसांपासून गावात लपूनछपून अवैद्य दारू विक्रीचा व्यवसाय करत होते. गावातील नागरिक दारूच्या आहारी जात असल्याने मेंढोली या गावातील काही महिलांनी याबाबत प्रशासनाला निवेदने दिली होती. त्यामुळे शिरपूर पोलिसांनी या चौघांच्या दारू अड्डयावर धाडसत्र अवलंबले होते.

याप्रकाराने चिढलेल्या चौघांनी गावातील एका महिलेच्या घरी जावून “तू आमची तक्रार का केली ?” असे म्हणत तिला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी या चौघांवर विनयभंगासह विविध कलमा अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. या प्रकारावरून अवैद्य व्यावसायिकांची मुजोरी वाढताना दिसत आहे.
वणी: बातमीदार