Home Breaking News टोल नाक्याजवळ गडचांदूर- वणी बस चा अपघात

टोल नाक्याजवळ गडचांदूर- वणी बस चा अपघात

1436
C1 20240404 14205351

सर्व प्रवाशी सुरक्षित

नागरिकांच्या सतर्कतेने मोठी घटना टळली

वणी: गडचांदूर वरून वणीला येत असलेल्या राज्य मार्ग परिवहन विभागाच्या बस ला गुरुवार दि. 23 सप्टेंबर ला दुपारी 1 वाजता येथील तोल नाक्याजवळ अपघात झाला. या बस मधील सर्व प्रवाशी सुरक्षित असून नागरिकांच्या सतर्कतेने मोठी घटना टळली.

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर डेपोतून बस क्रमांक MH-40-AQ- 6062 ही वणीला जात होती. अवघ्या 2 किमी अंतरावर पोहचण्यापूर्वीच ब्राम्हणी फाट्या जवळ काही नागरिकांना बस चे मागील चाक निखळण्याच्या अवस्थेत दिसले. त्यांनी दुचाकी वरून बसचा पाठलाग केला आणि चालकाला बस थांबविनाचा प्रयत्न केला.

बसचा पाठलाग तीन ते चार दुचाकीस्वारांनी केला, अखेर बसच्या चालकाने टोल नाक्याला बस ‘भिडवली’ यामुळे प्रवाशी प्रचंड घाबरले. नेमकं काय झालं हे त्यांना कळलं नाही. परंतु वणीला पोहोचण्यापूर्वी जर ते चाक निखळलं असतं तर मोठा अनर्थ घडला असता असे बोलल्या जात आहे.

Previous articleडॉ. पुंड यांचा गणेशोत्सवात सत्कार
Next articleशहरातील मोकाट डूकरांचा बंदोबस्त करा
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.