Home वणी परिसर डॉ. पुंड यांचा गणेशोत्सवात सत्कार

डॉ. पुंड यांचा गणेशोत्सवात सत्कार

92

वणी- येथील राम शेवाळकर परिसरात प्रथमच स्थापन केलेल्या गणेशोत्सव मंडळात गणेश तत्वज्ञानाचे पंडित विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड ह्यांचा शाल,.श्रीफळ व पुष्पहार अर्पण करुन सपत्नीक भावोत्कट सत्कार माधव सरपटवार यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रा. पुंड ह्यांच्या गाणपत्य संप्रदायातील मौलिक सेवेबद्दल हा औचित्यपूर्ण सत्कार होता. 52 वर्षीय पुंड ह्यांची 61 पुस्तके आतापर्यंत प्रकाशित झालेली असून त्यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. श्री गणेशाच्या आरतीचा एक दिवशीय सन्मानही त्यांना सहकुटुंब सहपरिवार देण्यात आला होता.

या प्रसंगी सुधीर साळी, निलेश कटारिया, तुळशीराम फुलझेले, प्रमोद वासेकर, मधुकर भुरचंडी, अनिल चांदवडकर, मनोज आकुलवार, भारती सरपटवार, मालती भुरचंडी, वृशाली देशमुख, सुमन जैन, नंदा कोंडावार, वासेकर परिवार, मुजगेवार, सचिन ठाकरे,  वल्लभ सरमोकदम इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.