Home वणी परिसर शहरातील मोकाट डूकरांचा बंदोबस्त करा

शहरातील मोकाट डूकरांचा बंदोबस्त करा

444
C1 20240404 14205351
●कॉग्रेसचे मुख्याधिकारी यांना निवेदन 

वणी :- शहरात मोकाट दुकरांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.या डुकरांमुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून त्यातून रोगराही पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.त्यामुळे या डुकरांच्या बंदोबस्त करा अन्यथा घेराव घालून आंदोलनचा इशारा शहर काँग्रेस कमिटीने निवेदनातून दिला आहे.

प्रभाग क्र. ५, राजीव गांधी चौक, नगरवाला जीन तसेच संपुर्ण वणी शहरात गल्लोगल्ली मोकाट ठुकरे फिरत असून दुर्गंधी पसरवित आहे. त्यामुळे लहान बाळांच्या आरोग्याला डेंगु सारखे भयावह रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शहरामध्ये जंतुनाशक फवारणी होत नसल्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.

मोकाट डुकरांमुळे डेंगू, मलेरीया, टाइफाइड  सारख्या रोगांना नागरीकांना बळी पडावे लागत आहे.  रस्त्यावर फिरणारे मोकाट जनावरे व डुकरे यांच्या मुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन आहे.छोटे मोठ्या अपघाताला आमंत्रण देत आहे. या मुलभुत कामांकडे वणी नगर परिषद दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे 15 दिवसात या मोकाट डुकरांचा बंदोबस्त न केल्यास नगर पालिकेला घेराव घालून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुख्याधिकारी यांना निवेदन देतांना प्रमोद निकुरे,इजहार शेख,संतोष पारखी, प्रमोद लोणारे,सुधीर खंडाळकर,निलेश परगंटीवार,अक्षय धावंजेवार संतोष सिस्दमशेटीवार, कैलास पोलवार, राहूल आसमवार, विक्की परंगरीवार राहूल मेदरवार अक्षय राज्जलवार, साई अंदलवार, उपस्थित होते.

 

 

 

Previous articleटोल नाक्याजवळ गडचांदूर- वणी बस चा अपघात
Next articleशनिवारी वणीत राष्ट्रीय लोक अदालत
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.