Home वणी परिसर दुःखद….सुनील चोपणे यांचे निधन

दुःखद….सुनील चोपणे यांचे निधन

● त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

1879

Sad News Wani | येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुनील दादाजी चोपणे यांचे दीर्घ आजाराने शनिवारी मध्यरात्री निधन झाले ते 60 वर्षाचे होते. Sunil Dadaji Chopane passed away after a long illness

सुनील चोपणे हे बालाजी पंत चोपणे विद्यालय येथे मुख्याध्यापक होते. एका वर्षापूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी वणी व सावरला येथील शाळेत देखील यशस्वी मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी पार पडली होती.

मुख्याध्यापक संघाचे जिल्ह्या सहसचिव म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती, मागील काही महिन्यांपासून ते दुर्धर आजाराशी झुंज देत होते. वणी येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचेवर शनिवार दिनांक 23 सप्टेंबरला सायंकाळी 7 वाजता येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलं, सून असा आप्त परिवार आहे त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)