Home Breaking News Ajit Minocha : मातें च्‍या भजनाचे भव्‍य जागरण

Ajit Minocha : मातें च्‍या भजनाचे भव्‍य जागरण

● मंगळवारी राजुर कॉलरी येथे आयोजन

155
C1 20231023 12023901

मंगळवारी राजुर कॉलरी येथे आयोजन

Wani News | राजुर कॉलरी येथील शीतला माता मंदिर समिती व श्रमिक दुर्गा उत्सव मंडळ यांचे वतीने जबलपुर येथील प्रसिध्‍द गायक अजित मिनोचा व ईशान मिनोचा यांच्‍या भव्‍य जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. A “bhavya jagarn” program has been organized for Ajit Minocha and Ishaan Minocha.

नवराञोत्‍सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येते, उत्‍साह, चैतन्‍य आणि समर्पण बघायला मिळते. राजुर कॉलरी येथे सुध्‍दा भक्‍तीमय कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते. मंगळवारी होत असलेल्या माता राणी यांच्‍या भजनाचे भव्‍य जागरण विशेष आकर्षण असणार आहे.

भव्‍य जागरणाचा कार्यक्रम राष्ट्रीय विद्यालयाच्या मैदानावर मंगळवार दिनांक 24 ऑक्‍टोबरला सायंकाळी 6 वाजता सुरु होणार आहे. जबलपुर येथील अजित मिनोचा व ईशान मिनोचा या प्रसिघ्‍द गायकांचा पहाडी आवाज भक्‍तीमय गितांसाठी पर्वणी ठरणार आहे.

शीतला माता मंदिर समिती व श्रमिक दुर्गा उत्सव मंडळ वार्ड क्रमांक 3 यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजीत भव्‍य जागरण कार्यक्रमाला परिसरातील नागरीकांनी उत्‍स्‍फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन डॅनी सँड्रावार, डेव्हिड पेरकावार, अनिल डवरे, धनराज देवताळे,  महाकाली पामुलवार,  श्रीराम डवरे, समन्ना कोंकटवार, संजय पिसे, सुनील कोहळे, स्वप्निल डवरे यांचेसह मंदिर समिती व दुर्गोत्‍सव समितीच्‍या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
ROKHTHOK NEWS