Home Breaking News विष प्राशन करणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू

विष प्राशन करणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू

2570

टोकाचे पाऊल का उचलले हे अस्पष्ट

रोखठोक | लालगुडा परिसरातील एका लेआऊट मधील रहिवाशी असलेल्या 20 वर्षीय तरुणाने विष प्राशन केले होते. त्याचेवर चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवार दि. 23 नोव्हेंबर ला प्राणज्योत मालवली. तरुणाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पवन रोकडवार (20) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो लालगुडा परिसरातील एका लेआऊट मध्ये आपल्या परिवारासह वास्तव्यास होता. त्याने नुकतेच डी फार्म पदविका प्राप्त केली होती, भविष्यात औषधी चे दुकान टाकण्याचं त्याचं स्वप्न होतं. शनिवारी त्याने घरा जवळील परिसरात विष प्राशन केले होते.

पवन ने विष प्राशन केल्याचे परिवारातील सदस्यांच्या लक्षात येताच त्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पाच दिवस त्याने मृत्यूशी झुंज दिली मात्र ती अपयशी ठरली. दि 23 नोव्हेंबर ला उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे कळाले नाही.
वणी: बातमीदार