Home Breaking News भीषण… गिट्टी खदाणीत अपघात, दुचाकीस्वार ठार

भीषण… गिट्टी खदाणीत अपघात, दुचाकीस्वार ठार

1424
संकलित छायाचित्र

● मोहदा येथील थरारक घटना

रोखठोक | मोहदा येथील बियाणी यांच्या गिट्टी क्रशर जवळ गुरुवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. गिट्टी ओढणाऱ्या लोडर मशीनचा फावडा दुचाकीवर आदळून दुचाकीस्वार ठार झाला तर दुसरा तरुण जखमी झाल्याची भीषण घटना घडली.

मोहदा येथे दोघे कामगार रात्री कर्तव्यावर दुचाकीने जात होते. बियाणी यांच्या गिट्टी क्रशर जवळ लोडर मशीनच्या साह्याने गिट्टी ओढण्याचे काम सुरू असताना अचानक मशीनचा फावडा दुचाकीवर आदळला.

अचानक घडलेल्या या अपघातात बिहार येथे मूळ वास्तव्यास असलेला कामगार घटनास्थळीच ठार झाला. तर दुचाकीवर मागे बसलेला मोहदा येथील युवक जखमी झाला आहे. ही घटना मध्यरात्री घडली, घटनेची माहिती अन्य कामगारांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

मोहदा येथे घडलेल्या अपघातातील मृतक व जखमींचे नाव अद्याप समजू शकले नाही. पोलिसांना पाचारण करण्यात आले असून घटनास्थळी पोलीस रवाना झाले आहे.
( अपडेट माहिती अगदी थोडया वेळातच )