Home Breaking News तीस वर्षीय तरुणाने मृत्यूला कवटाळले

तीस वर्षीय तरुणाने मृत्यूला कवटाळले

● दरदिवशी होताहेत आत्महत्या

1397
C1 20231223 15491881
C1 20240404 14205351

दरदिवशी होताहेत आत्महत्या

Sad News Wani : तालुक्यातील पठारपूर येथे वास्तव्यास असलेल्या 30 वर्षीय तरुण शेतकरी पुत्राने गळफास लावून जीवनयात्रा संपवली. ही घटना शनिवार दिनांक 23 डिसेंबर ला पहाटे उघडकीस आली. A 30-year-old young farmer’s son ended his journey by hanging himself.

स्वप्नील संजय गारघाटे (30) असे मृतक तरुणाचे नाव आहे. तो आपली वडिलोपार्जित शेतजमीन कसत होता. शुक्रवारी तो नेहमीप्रमाणे शेतात गेला होता रात्री तो घरी परतला नाही. शनिवारी सकाळी एका शेतकऱ्याला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

मृत्यू फार स्वस्त झाला आहे, तरुण का आत्मघात करतात हे न उलगडणारे कोडे आहे. तालुक्यात आत्महत्येचे पीक आले आहे. दरदिवशी विविध कारणाने आत्महत्या होताहेत. आर्थिक चणचण, नैराश्य हेच कारण असावे असा कयास वर्तवल्या जात आहे.

स्वप्नील याने शेतातील झाडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून आपले जीवन संपवले. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी व तीन वर्षाची मुलगी असा परिवार आहे. ही घटना पोलिसांना कळताच पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.
Rokhthok News