Home Breaking News राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सुनयना येवतकर

राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सुनयना येवतकर

● प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली नियुक्ती

548
C1 20231223 13381716
C1 20240404 14205351
 प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली नियुक्ती

Political News : सामाजीक कार्यकर्त्‍या सुनयना संजय येवतकर यांची राष्‍ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्‍या (अजीत पवार गट) यवतमाळ जिल्‍हा महिला अध्‍यक्षपदी निवड करण्‍यात आली. नागपुर येथे उपमुख्‍यमंञी अजित पवार यांचे हस्‍ते नियुक्‍ती पञ देण्‍यात आले. याप्रसंगी पक्षाचे मान्‍यवर प्रामुख्‍याने उपस्थित होते. Deputy Chief Minister Ajit Pawar’s hand was given the appointment letter.

C1 20231223 13393315

यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्त्या, समर्पण बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या यवतमाळ जिल्हा महिला अध्यक्ष तसेच सावित्रीआई फुले महिला मंडळच्‍या सदस्‍या सुनयना संजय येवतकर यांची राष्‍ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्‍या (अजीत पवार गट) महिला जिल्‍हा अध्‍यक्षपदी निवड करण्‍यात आली.

C1 20231223 13391149

प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नियुक्तीपत्र देताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी प्रयत्नशील रहाल. तसेच करण्यात आलेली नियुक्ती पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरण सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असेल असे नमूद करण्यात आले आहे.

सुनयना येवतकर ह्या धडाडीच्‍या तडफदार कार्यकर्त्‍या आहेत. त्‍यांनी अनेक सामाजीक उपक्रम राबवले आहेत. त्‍यांचेवर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली असुन संघटनात्‍मक बांधणी योग्‍यपध्‍दतीने करतील अशी अपेक्षा बाळगण्‍यात येत आहे. त्‍यांनी आपल्‍या निवडीचे श्रेय आ. इंद्रनिल नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश  उपाध्यक्षा क्रांतीताई राऊत (धोटे) यांना दिले आहे.

C1 20231223 13383616

मुंबई येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी नियुक्‍ती केली आहे. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष क्रांती लालाजी राऊत (धोटे), वसंतराव घुईखेडकर, यवतमाळ  जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कामनकर,  यवतमाळ  शहर अध्यक्ष लालाजी राऊत प्रामुख्‍याने उपस्थित होते. तसेच अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ यांनी सुद्धा सुनयना येवतकर (अजात) यांचे पक्षात स्वागत केले आहे.
Rokhthok News