Home Breaking News वाघाने पाडला दोन जनावरांचा फडशा

वाघाने पाडला दोन जनावरांचा फडशा

635
C1 20240404 14205351

धाबापूर शिवारातील घटना

वणी:– तालुक्यात वाघाचा वावर गेल्या अनेक महिन्यांपासून आहे. आता पर्यंत अनेक जनावरांना वाघाने ठार केले आहे. धाबापूर शिवारातील शेतात चरत असलेल्या दोन जनावरांवर वाघाने हल्ला करून फडशा पाडल्याने पशुपालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वणी तालुक्यात सध्या दोन वाघाचा वावर दिसून येत आहे. रासा, कोरंबी, मारेगाव, उकणी व निलजई या परिसरात अनेकांना वाघाचे दर्शन झाले आहे. तसेच रासा घोन्सा परिसरात अनेक जनावरांवर हल्ले चढवून ठार केल्याचा घटना घडल्या आहेत.

चिखलगाव येथील पांढुरंग अतकरे यांचे धाबापूर शिवारात शेत आहे दि 23 जानेवारीला सायंकाळी 5 वाजताचे सुमारास त्यांच्या मालकीची गाय व वासरू शेतात चरत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने ठार केले. त्यामुळे या शेतकऱ्यांचे 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. मात्र सतत जनावरांवर सुरू असलेल्या हल्या मुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वणी : बातमीदार