Home वणी परिसर केंद्रीय मंत्री भुपेंद्रसिंग यादव आज ‘वणीत’

केंद्रीय मंत्री भुपेंद्रसिंग यादव आज ‘वणीत’

● पार्श्वभूमी महा जनसंपर्क अभियानाची

265
C1 20240404 14205351

पार्श्वभूमी महा जनसंपर्क अभियानाची

BJP NEWS WANI | पंतप्रधान नरेद्र मोदी सरकारच्‍या कार्यकाळाला 9 वर्षे पुर्ण झाली आहेत. त्‍यानिमीत्‍य देशात मोदी @9 महाजनसंपर्क अभियान राबविण्‍यात येत आहे. त्‍या पार्श्‍वभुमीवर केंद्रीय मंत्री भुपेंद्रसिंग यादव आज वणीत येत आहेत. येथील शेतकरी मंदीर येथे दि. 24 जुनला भव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. Union Minister Bhupendra Singh Yadav is coming to Wani today.

देशात मोदी सरकारच्‍या 9 वर्षाच्या कालखंडात देशात झालेला विकास मोदी @ 9 या महाजनसंपर्क अभियाच्‍या माध्‍यमातुन घरा घरात पोहचविला जात आहे. आमदार संजिवरेडडी बोदकुरवार यांनी पत्रपरीषदेच्‍या माध्‍यमातुन अभियानाला सुरवात करणार असल्‍याचे नुकतेच जाहीर केले होते.

मोदी @ 9 अभियानाच्‍या पार्श्‍वभुमिवर शेतकरी मंदीर येथे दुपारी 12 वाजता केंद्रीय पर्यावरण व वने मंत्री भुपेंद्रसिंग यादव यांच्‍या संयुक्‍त मोर्चा संमेलनाचे आयोजन करण्‍यात आले आहे. संमेलनानंतर ते शहरातील विवीध सामाजिक क्षेत्रात योगदान असलेल्‍या मान्‍यवरांच्‍या भेटी घेणार असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे.
Rokhthok News